स्वच्छता नदीवर माहिती

चंद्रभागा स्वच्छता अभियान

चंद्रभागा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कमिटी नेमण्यात येणार आहे. पंढरपूर येथे असलेला १५ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या १२ दशलक्ष लिटर क्षमतेने सुरु आहे. आषाढी - कार्तिकी एकादशीच्या काळात वारी दरम्यान १८ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते म्हणजेच या काळात साधारणता ६ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले पाणी चंद्रभागेत सोडले जाते. या प्रकल्पाची क्षमतावृद्धी करण्याचे काम नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नमामि चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी पंढरपूरचे महत्त्व आणि तिथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.